Weather Update :
राजस्थानमधून परतीच्या मान्सूनचा अर्थातच नैर्ऋत मोसमी वाऱ्याने प्रवास सुरु केला आहे. दरवेळी राजस्थानमधून परतीचा मान्सून (monsoon return update) १७ सप्टेंबरपासून सुरु करतो पण यंदा ८ दिवस उशिराने हा प्रवास सुरु झाला आहे. काल (दि.२५) पासून मान्सूनने परतीच्या प्रवासा सुरुवात केली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.
मान्सून प्रवास सुरु झाला असला तरी राज्यात अद्यापही मान्सून सक्रीय आहे. महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज (दि.२६) सप्टेंबर रोजी धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे.कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे.
दरम्यान, १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र यंदाही मान्सूनने ८ दिवसाने (ता.२५) मॉन्सूनने राजस्थानातून माघारी परतण्यास सुरुवात केली आहे. २ जुलै रोजी संपूर्ण देशात पोचलेल्या मॉन्सूनने २ महिने आणि २३ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.
Published on: 26 September 2023, 11:02 IST