Weather

यावर्षी उन्हाळा म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतका नकोसा झालेला आहे. संपूर्ण भारतातत उन्हाळ्याचा कहर सुरू आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा संपूर्ण भारतात आहे.

Updated on 15 May, 2022 1:51 PM IST

 यावर्षी उन्हाळा म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतका नकोसा झालेला आहे. संपूर्ण भारतातत उन्हाळ्याचा कहर सुरू आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा संपूर्ण भारतात आहे.

 भारतातील बहुतेक राज्यात पारा हा 45 ते 48 अंशावर गेला आहे. जर या तापमानाच्या जागतिक स्थितीचा विचार केला तर जगातील 2022 यावर्षीच्या सगळ्यात उच्च तापमानाची नोंद पाकिस्तानामध्ये झाली असून पाकिस्तानचे जेकोबाबाद शहरात काल सर्वोच्च कमाल तापमान 51 अंश डिग्री सेल्सिअस होते. या आधी ऑस्ट्रेलियात 50.7 अंश तापमानाची नोंद झाली होती. ते रेकॉर्ड मोडीत काढत पाकिस्तानात सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली.

 भारतातील एकंदरीत तापमानाची स्थिती

पाकिस्तान सोबतच भारतात देखील अनेक ठिकाणी पारा हा 48 अंशांच्या पार गेला आहे. पश्चिम राजस्थान मध्येपारा 48 अंशांवर होता. 13 मे रोजी पिलानी येथे 47.7अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाची तीव्रता वाढली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.एकंदरीत संपूर्ण भारतात देखील कमाल तापमानात खूपच वाढ होत आहे.

वातावरणीय सातत्याने बदलत असून अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे.वातावरणामध्ये आर्द्रता वाढत आहे त्यामुळे पावसाचे ढग जास्त वेळ आद्रता रोखू शकत नाही व कमी वेळात पाऊस होतो. त्यामुळे दुष्काळ पडत असून उष्णतेच्या लाटामध्ये वाढ होत आहे. तसेच हिवाळ्यात मध्ये देखील पश्चिमेकडून येणारी हवा अरबी समुद्रावरून जात उष्ण होत असल्याने उन्हाळ्यात सोबत हिवाळ्यातही  दिवसाचे तापमान वाढत आहे.तसेच महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी बहुतेक जिल्ह्यात पारा हा 45 अंशापर्यंत आहे.

एका बाजूला उष्णते मुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. यांवर फार विपरीत परिणाम या तापमानवाढीचा होत आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Superb Bussiness Idea: गल्लीगल्लीत आणि कुठल्याही हंगामात अगदी चांगल्या पद्धतीने चालणारा हा व्यवसाय करून कमवा चांगला नफा

नक्की वाचा:अरे वा! 'या' योजनेअंतर्गत मिळते बिनव्याजी एक लाखांपर्यंत कर्ज, वाचून घ्या सविस्तर माहिती

नक्की वाचा:Mango Cultivation Tricks: आंबा लागवडीतून जास्त उत्पादन हवे असेल तर या पद्धतीने करा लागवड, होईल फायदा

English Summary: the highest temperature recorded in pakistan jakobabaad city in the world
Published on: 15 May 2022, 01:45 IST