राज्यात सध्या काही दिवसांपासुन ढगाळ हवामान असून वातावरण सतत चढ-उतार होत आहे. तरी पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशासह राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यांत काही ठिकाणी अजुनही तुरळक पाऊस सुरु आहे ,तर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज असून 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात गारपीटीची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्यातील काही जिल्ह्यातील वातावरणात घट झाल्याने धुक्यासह दव पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याकारणाने पहाटे गारठा तर दुपारी उकाडा अनुभवायला मिळत आहे. तसेच येत्या काही दिवसांत थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Published on: 11 December 2023, 11:27 IST