Weather

यावर्षी जेव्हापासून पावसाची सुरुवात झाली तेव्हापासून जून महिना वगळता जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाने महाराष्ट्रामध्ये उभ्या पिकांचे अगणित नुकसान केले. त्यानंतर जे काही उरलीसुरली पिके होती ती देखील ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून हातातून नेली.आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातल्या त्यात मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी आता रब्बी सांगा मला सुरुवात केली असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या शक्यतामुळे बळीराजाची धाकधूक वाढली आहे.

Updated on 12 December, 2022 7:38 PM IST

नक्की वाचा:Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; या जिल्ह्यांत आजही मुसळधार पाऊस

खरं पाहता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल मॅनदौस चक्रीवादळ आता विरलं आहे, वादळाचा जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रावरील संकट पूर्णपणे संपलेल दिसत नाही. कारण की पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे.दक्षिण अंदमान जवळ आता चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या हवामान स्थितीमुळे पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.विभागाने दिलेल्या नवीनतम माहितीनुसार, मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

नक्की वाचा:रॉक फॉस्फेट बागेसाठी उत्तम पर्याय; उत्पादनात होणार वाढ

हवामानातील बदल हा चक्रीवादळाचा प्रभाव आहे.यामुळे वाऱ्याची दिशा आणि गती बदलली आहे. अरबी समुद्र केरळ आणि कर्नाटक किनारी वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. वाऱ्याचा वेग हा जवळपास 55 किलोमीटर ताशी एवढा राहणार आहे. साहजिक मासेमारीं करण्यासाठी खोल समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर जवळ बंगालच्या उपसागरात अंदमानजवळ चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. कोकणातील चार आणि मध्य महाराष्ट्रातील 10 अशा एकूण 14 जिल्ह्यात पाऊस कोसळणार आहे.मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नासिक, सांगली, सोलापूर या भागात अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. निश्चितचं रब्बी हंगामाच्या ऐन तोंडावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

नक्की वाचा:IFFCO-MC’s Takibi: शेतकऱ्यांसाठी एक उत्तम कीटकनाशक; होईल भरभराट

English Summary: the effect of mandaus cyclone is less but guess of rain is some district in maharashtra
Published on: 12 December 2022, 07:38 IST