दक्षिण-पश्चिम मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर देशभरात पावसाळा सुरू झाला आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, IMD म्हणजेच भारतीय हवामान खात्याने सोमवारी अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.
IMD ने सांगितले की बिहार, अरुणाचल प्रदेश आणि गोव्यात आज आणि उद्या मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराममध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. यासोबतच, मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीत हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
पुढील २४ तासांत कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, लक्षद्वीप, कोकण, गोवा, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य बिहारमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, दक्षिण गुजरात, किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
खुशखबर! राज्यातील खासगी अनुदानित शिक्षकांना मिळणार चार टक्के महागाई भत्ता वाढ
दिल्लीत आठवडाभर पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत संपूर्ण आठवडा पावसाचा अंदाज आहे. आज किमान तापमान 27 तर कमाल तापमान 35 अंश नोंदवले जाऊ शकते. त्याचबरोबर आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. तर बुधवारी दिल्लीत किमान तापमान 27 आणि कमाल 34 तापमानाची नोंद होऊ शकते. बुधवारीही दिल्लीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. ही मालिका शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. दुसरीकडे, रविवारी दिल्लीत चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते.
टोमॅटोचा भाव 140 रुपये किलो; या कारणामुळे लोकांना मोठी किंमत मोजावी लागतीय...
Published on: 05 July 2023, 11:52 IST