Weather

Weather Update : उन्हाळ्यात देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे.

Updated on 30 April, 2023 1:08 PM IST

Weather Update : उन्हाळ्यात देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.

काय आहे अंदाज

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. तर विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १, २ व ३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात १ मे रोजी गारपीट तर २ आणि ३ मे रोजी पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

आनंदाची बातमी! अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू; कर्जमर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवली

विरार, वसई, नालासोपारामध्ये रविवारी पहाटेपासून अवकाळी पाऊस सुरु झाला. परिसरात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊसही होत आहे. सकाळपासून रिमझिम पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे.

मुंबईमध्ये आज सकाळी ठीक-ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याची दृश्य पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगर,मुंबई शहरात आणि पश्चिम उपनगरामध्ये अवकाळी पावसाने ही हजेरी लावलेली आहे. 5 मे पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी त्याच सोबत मुंबईमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

शेतमाल तारण कर्ज योजना; शेतकऱ्यांना ठरतेय वरदान

English Summary: Severe weather warning issued by IMD in the state for five days
Published on: 30 April 2023, 01:08 IST