अभिषेक सुनील खेरडे - हवामान अभ्यासक
ऑगस्ट महिन्यातील बऱ्याच ठिकाणी पडलेल्या लांब अश्या खंडानंतर काहीसा दिलासा देणारी पावसाळी प्रणाली विकसित होत आहे. सध्याचा मान्सून आस (ट्रफ ) हा आपल्या जागेवरून दक्षिणेकडे झुकण्यास प्रतिकूल परिस्तिथी मध्ये आहे. त्यामुळे 3 तारखेला त्याचे पूर्व टोक दक्षिण दिशेकडे झुकण्यास समर्थ आहे.
तसेच बंगालच्या उपसागर वरील कमी दाब जो 3 सप्टेंबर ला भुवनेश्वर आणि विशाखापत्तनम या मध्ये तयार होतोय याचा एकूणच फायदा असा कि महाराष्ट्र आणि लागतंच्या प्रदेशात, मध्य भारतात पुढील 10-12 दिवस चांगला पाऊस होणार आहे, आणखीन तिकडे अरबी समुद्रात कमी दाब प्रणाली विकसित होण्याच्या मार्गावर तयार झालेली आहे.
जो साधारण 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर च्या दरम्यान तयार होईल यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये कोकण किनारपट्टी आणि पर्जन्य छायेतील प्रदेश, इतर भागा मध्ये जोरदार पाऊस होईल असे असे एकूणच सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस राहील असे चित्र दिसत आहे.
उद्या महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात ही मध्य महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा ,प. महाराष्ट्र मध्ये घाट माथ्यावर विजांचा गडगडाट सह शक्यता आहे सातारा,सांगली, कोल्हापूर, पुणे , धाराशिव तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला,चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली,आणि गोंदिया इथे पन गडगडाट सह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र सोबत च मराठवाडा भागात धाराशिव, लातूर, जालना, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच विजांचा गडगडाट राहील.
Published on: 01 September 2023, 06:13 IST