Maharashtra Rain Update: राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे काही जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी
रायगड (Raigad)
रत्नागिरी (Rantnagiri)
पालघर (Palghar)
पुणे (Pune)
कोल्हापूर (Kolhapur)
नाशिक (Nashik)
गडचिरोलीला (Gadchiroli)
हे ही वाचा: New business idea: फक्त 60 रुपयांत 10 लिटर दूध बनवा, खर्च कमी, नफा जास्त
पुण्यात मुसळधार पाऊस
पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय.
धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हे ही वाचा: ब्रेकिंग! शिंदे सरकार पडणार की टिकणार, सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश, आमदारांवर...
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढील 48 तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे ही वाचा: नादच खुळा! आजीने वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक; धैर्याला आणि आत्मविश्वासाला सलाम
Published on: 12 July 2022, 08:55 IST