Weather

मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. यावर्षी पिकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. मात्र पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबिनची माती अशी अवस्था पिकांची झाली आहे.

Updated on 12 October, 2022 3:28 PM IST

मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. यावर्षी पिकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. मात्र पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबिनची (damage soybeans cotton) माती अशी अवस्था पिकांची झाली आहे.

सुरुवातीला महागडी खत बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची (damage soybeans)पेरणी केली जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार झालेल्या पावसाने सुरुवातीपासूनच ही पिकं पावसाच्या कचाट्यात आली. मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले तरीही शेतकरी उभे राहिले.

शेतकऱ्यांनो पिकांच्या पेरणीपूर्वी हे एक काम करा; खर्चामध्ये मोठी बचत होईल

परंतु आता सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली सोयाबीन, कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजवून गेल्या आहेत. यासह अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले असल्याने. शेतकऱ्यांवर (farmers) पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांनो मसूर मिश्र शेतीची करा लागवड; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न

कापसाचे पाहिले तर वेचणीला कापूस आला आहे. त्यामुळे कापसाची देखील काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र पाहायला मिळतंय आहे. संपूर्ण कापूस (cotton) पाण्यामुळे भिजल्याने कापसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतातून निघणाऱ्या या उत्पादनावर दिवाळी सणाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतातून उत्पादन निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो रब्बी पिकांसाठी 'या' तीन सेंद्रिय खतांचा वापर करा; मिळणार भरघोस उत्पन्न
शासकीय धान खरेदी विक्रीसाठी 41 ठिकाणी नोंदणी केंद्र; शेतकऱ्यांना होणार फायदा
लम्पी प्रादुर्भाव! जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता तसेच धूर फवारणीची जनजागृती आता शिक्षकांवर

English Summary: Return rain Major damage soybeans cotton Farmers worried
Published on: 12 October 2022, 03:26 IST