Weather

येत्या ३ दिवसांत कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांतून मान्सून माघारी फिरवण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

Updated on 11 October, 2023 4:43 PM IST
AddThis Website Tools

Monsoon Update : देशातून मान्सून परतीचा प्रवास सुरु आहे. मात्र दोन दिवसांपासून मान्सून प्रवास रखडल्याने विविध भागात पावसाची हजेरी आहे. तर राज्यात मात्र उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेघालयसह सिक्कीमध्ये अतिवृष्टी झाली असून पुढील २४ तासांतही या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येत्या ३ दिवसांत कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांतून मान्सून माघारी फिरवण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. राज्याच्या बहुतांश भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडका जाणवू लागला आहे. यामुळे लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर हिट वाढली
पुणे शहरातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली असून सोमवारी (ता. ९) शहरात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सरासरीपेक्षा तापमानात दोन अंशांनी वाढ झाली होती. कमाल तापमानात होत असलेली वाढ यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असून दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

English Summary: Return of monsoon hampers travel See the presence of rain here and there
Published on: 11 October 2023, 04:43 IST