Rain Update : परतीच्या पावसाने अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी लावली आहे. सिक्किममध्ये ढगफुटी होऊन आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल,बिहार, झारखंडमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र राज्यात पावसाने उघडीप दिली असून ऑक्टोबरची उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तसंच राज्यात अधून हलका पाऊस होत आहे तर कुठे जोरदार पाऊस होत आहे.
कोकणात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे कोकणात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
कोकण, कोल्हापूर, रत्नागिरी, रागयडमध्ये पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यासोबतच पूर्व भारतातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: 05 October 2023, 05:12 IST