Rain News :
राज्याच्या अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भात पावसाचे प्रमाणात जास्त होते. तसंच उर्वरित राज्याच्या भागात देखील हलका-मध्यम पाऊस झाला आहे. हवामान खात्याने उद्या (दि.२२) राज्यात जोरदार पावसाचा शक्यता व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसंच विदर्भात ऑरेंज दिला आहे.
हवामान खात्याने आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार काही भागात पाऊस झाला. पण सर्वत्र हा पाऊस झाला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
खानदेशातील जळगाव आणि धुळे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर कोकणातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता.
दरम्यान, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
Published on: 21 September 2023, 05:47 IST