मुंबई: या वर्षी मान्सून (Monsoon) ३ दिवस उशीरा आला. पण आता राज्यातील विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये (Mumbai) मान्सूनचे आगमन झालं आहे. राज्यातील काही भागात पेरणीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
काल मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. कोकण आणि मुंबईत दाखल झालेला मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रात 279 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पाऊस आला रे..! तुमच्या भागात कधी पाऊस पडणार जाणून घ्या...
वादळी वाऱ्यासह पाऊस
पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिक, पुणे,(Pune) पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला झाला. नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला.
त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
Published on: 13 June 2022, 11:31 IST