राज्यात मागिल काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे दोन दिवसांपासून राज्यात धुक्याची चादर पसरली आहे. राज्यातील काही भागांमध्ये दाट धुके पडत असून, मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे. तसेच आज नाशिक, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल आहे. तर राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने चक्रीवादळ तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात समुद्रात उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या परिस्थितीमुळे राज्यात पाऊस सुरूच आहे. आज नाशिक, नगर जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला असून, काही ठिकाणी पावसामुळे तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटसह मध्यम ते हलका पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात काही भागांमध्ये चार ते पाच दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Published on: 03 December 2023, 11:38 IST