मुंबई: राज्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जूनचा मध्य संपत आला तरी महाराष्ट्रात अजूनही मान्सून हवा तसा स्थिर झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्र ओलांडून मराठवाड्यात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जाणून घेऊया पावसाचा अंदाज...
मुसळधार पाऊस:
1. पालघर
2. ठाणे
3. रायगड
4. रत्नागिरी
5. सिंधुदुर्ग
तुरळक पाऊस:
धुळे
नंदुरबार
जळगाव
नाशिक
नगर
कोल्हापूर
सातारा
सांगली
Rain Update: शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका; पहा मान्सून कुठे अडकलाय..!
मेघगर्जना (विजांच्या कडकडाटासह):
1. सोलापूर
2. औरंगाबाद
3. जालना
4. परभणी
5. बीड
6. हिंगोली
7. नांदेड
8. लातूर
9. उस्मानाबाद
Published on: 23 June 2022, 02:32 IST