पुणे
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तसंच हवामान खात्याने खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना तुरकळ ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.
आज खानदेशातील नाशिक, जळगाव, मराठवड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ढगांच्या गडगडासह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.
मागील आठ दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच काही पिकांना आता पाण्याची गरज आहे. ऑगस्टच्या दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
Published on: 15 August 2023, 04:35 IST