Weather News
राज्यात उघडीप दिलेल्या पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्या (दि.१९) गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. तर कुठे उघडीप आहे. मात्र उद्या पुणे, मुंबई आणि कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यभरात सर्वत्र मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याकडून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आज नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलका पावसाने हजेरी लावली आहे. उद्याही राज्यात पावसाची उघडीप राहणार असून कोकणात मात्र विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बुधावरपासून (दि.२०) राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. बुधवारी विदर्भात विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, काल रविवारी (दि.१७) राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज सोमवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्या भागात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे.
Published on: 18 September 2023, 06:04 IST