Weather

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाल आहे. तर उर्वरित कोकणात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Updated on 29 September, 2023 4:46 PM IST

Rain Update :

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाल्यामुळे राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात हलका तर काही भागात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाल आहे. तर उर्वरित कोकणात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काल गुरुवारी (दि.२८) रोजी देखील मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ आणि खानदेशच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर रविवारपासून पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मात्र अनेक भागात अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणाच्या भागात पाऊस झाला आहे. मात्र काही जिल्ह्यात अजूनही चांगला पावसाची शक्यता आहे. दरम्यान आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

English Summary: Rain forecast in the state Know the status of returning monsoon
Published on: 29 September 2023, 04:46 IST