Weather

Weather Forecast: काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण देशात नैऋत्य मान्सूनचं आगमन झालं आहे. देशात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत.

Updated on 04 July, 2022 10:23 AM IST

Weather Forecast: काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण देशात नैऋत्य मान्सूनचं आगमन झालं आहे. देशात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत.

गल्ली ते दिल्ली पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 5 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार गुजरात, ओडिशा, झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाबमध्ये बल्ले बल्ले ! महिन्याला 300 युनिट मोफत वीजेची योजना सुरू; शिंदे सरकार घेणार का असा निर्णय?

पुढील पाच दिवस मध्य भारतातील बहुतांश भागात मुसळधार पडण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे.

त्यानुसार छत्तीसगडमध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

नवनियुक्त मुख्यमंत्री शेती बाबत 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये...
शेतीचा वाद बरा नव्हे; मुलांनीच केली जन्मदात्या पित्याची हत्या

English Summary: "Rain forecast from street to Delhi"; warning of torrential rain in this area
Published on: 04 July 2022, 10:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)