Weather

Maharashtra Rain: देशातील बळीराजा वाट पाहत असलेला मान्सून यंदा वेळेवर दाखल झाला आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही वरुणराजा बरसताना दिसत नाही. त्यामुळे काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेती कामे उरकली आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. येत्या ४ दिवसांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Updated on 25 July, 2022 10:18 AM IST

Maharashtra Rain: देशातील बळीराजा वाट पाहत असलेला मान्सून (Monsson) यंदा वेळेवर दाखल झाला आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही वरुणराजा बरसताना दिसत नाही. त्यामुळे काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेती कामे (Agricultural work) उरकली आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. येत्या ४ दिवसांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर राज्यात अजून काही ठिकाणी पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. भारतीय हवामान खात्याकडून देशातील काही राज्यांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भावांनो कमी खर्चात कमवा चौपट नफा! करा हा व्यवसाय आणि बना लखपती

IMD चा या राज्यांसाठी अलर्ट

भारतीय हवामान खात्यानेही पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार या राज्यांव्यतिरिक्त 24 ते 27 जुलै दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि यूपीमध्येही पावसाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांनो लखपती बनायचंय ना! तर बाजार प्रचंड मागणी असणारा हा शेतीव्यवसाय कराच...

गेल्या २४ तासांत या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

गेल्या २४ तासांत पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कोकण आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाली आहे. यासह, पश्चिम राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, कर्नाटकचे दक्षिण अंतर्गत भाग, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:
भावांनो कमी खर्चात कमवा चौपट नफा! करा हा व्यवसाय आणि बना लखपती
दूध उत्पादकांचे अच्छे दिन! दुभत्या जनावरांना खाऊ घाला चॉकलेट; दुधात होईल भरघोस वाढ

English Summary: Rain for the next 4 days; IMD issued red alert
Published on: 25 July 2022, 10:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)