Maharashtra Weather Update : देशभरातील वातावरणात बदल झालेल्या पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका अजून कायम आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. आता देशासह राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सध्या थंडीचा कडाका कमी झाला असला तरी या भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र इथं पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. या भागातील जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाल्यामुळं थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ज्या भागात कमी तापमान होते तेथिल तापमान ३ ते ४ अंशाने तापमाान वाढले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे देशासह राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. तसंच सध्या राज्यात हिवाळा आणि पावसाळा यांचा अनुभव येत आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. राज्यात सकाळी आणि रात्री थंडी आणि दिवसा ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान,हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तासात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने दिल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आधीच नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Published on: 03 January 2024, 11:29 IST