Weather Update :
राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस होत. मात्र जोरदार पावसाची प्रतिक्षा अद्यापही शेतकऱ्यांना आहे. यातच पुन्हा एकादा हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबईत सकाळपासून अधूनमधून पावसाची हजेरी सुरु आहे. राज्याच्या इतर भागात हलका पाऊस होत आहे. मात्र जोरदार पाऊस होताना दिसत नाही.
हवामान खात्याकडून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने (दि.८) रोजी विदर्भ, खानदेश आणि कोकणला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवड्यात देखील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज दलिा आहे. मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी अद्यापही मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात पावसाच्या आगमनाचे स्वागत केले आहे. तर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. या भागातील शेतकरी काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. तर पाण्याअभावी पीके जळण्याच्या मार्गावर होती. मात्र बुधवारी पावसाने हजेरी लावण्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने धावपळ नागरिकांची धांदल उडाली झाली.
Published on: 07 September 2023, 06:10 IST