Weather

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सध्या महाराष्ट्रात हलकी थंडी सुरु असून वातावरणात चढ - उतार होत आहे. मात्र बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे.

Updated on 25 November, 2023 5:54 PM IST

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सध्या महाराष्ट्रात हलकी थंडी सुरु असून वातावरणात चढ - उतार होत आहे. मात्र बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे.

हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे. तर मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसासोबतच वादळी वारे, गारपिटीचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.

English Summary: 'Orange' and 'Yellow Alert' in the state, warning of unseasonal rain for the next three days; Meteorological department forecast
Published on: 25 November 2023, 05:54 IST