Pune News : मागील काही दिवसांपासून विदर्भात ऑक्टोबर हिटचा चटका चांगलाच वाढला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याचा परिणाम दैनदिन जीवनक्रमावर होऊ लागला आहे. विदर्भातील अकोल्यात तापमानाचा पारा ३८ अंशांवर पोहचला आहे.
राज्यातून मान्सून परतल्याने हवामान कोरडे झाले आहे. यामुळे तापमानात वाढ होताना दिसत आहे. अकोल्यात आधीपासूनच तापमान असताना त्यात ऑक्टोबर हिटने आणखी भर घातली आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेत.
गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान ३५ अंशांपार पोहचले आहे. यामुळे नागरिक आता गरमीने हैराण झाले आहेत. ब्रह्मपुरी, चंद्रपूर ,अकोला आणि वर्ध्यात तापमानाच्या पाऱ्याचा आलेख चढता आहे. वर्ध्याचे तापमान ३६ अंशावर गेल्याने नागरिक हैराण झालेत.
दरम्यान, देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु आहे. येत्या काही दिवसात तो देखील पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा राज्यात तापमानाच्या पाऱ्याचा आलेख चढता राहिल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसंच देशभरात बुधवारपासून उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: 17 October 2023, 02:46 IST