Weather

दिवसेंदिवस तापमानात (Temperature) वाढ होत आहे. पण आता एक आनंदाची समोर आली आहे. यंदा मान्सूनचे (Monsoon rain) लवकरच आगमन होणार आहे. यावर्षी देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे.

Updated on 06 May, 2022 12:55 PM IST

दिवसेंदिवस तापमानात (Temperature) वाढ होत आहे. पण आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सूनचे (Monsoon rain) लवकरच आगमन होणार आहे. यावर्षी देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. असा अंदाज युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेने कडून वर्तविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात तापमानाने ४० चा पारा पार केला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक चांगेलच हैराण झाले आहे. आता अशातच शेतकऱ्यांसह नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. यंदा मान्सून १० दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चालू वर्षी १० दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

PM Kisan Samman Nidhi: यादीमध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला मिळणार दरमहा पेन्शन; जाणून घ्या नियम आणि अटी

देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज हा 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

मान्सूनचा पाऊस तळकोकणात कधी दाखल होणार? याचा अंदाज अद्याप हवामान खात्याने जाहीर केलेला नाही. मात्र, मान्सूनचा आजवरचा साधारण प्रवास लक्षात घेता केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात (Konkan) दाखल होऊ शकतो.

डाळिंब फळ प्रक्रिया आणि फायदे...

English Summary: Monsoon will hit the country 10 days in advance; Chance of rain soon this year
Published on: 06 May 2022, 12:42 IST