Weather

Monsoon Update: भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) नुसार, बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगा पश्चिम बंगालमध्ये पुढील पाच दिवसांत मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पुढील 48 तासांत नैऋत्य मान्सून ओडिशात दाखल होण्याची शक्यता आहे.

Updated on 15 June, 2022 7:23 PM IST

Monsoon Update: भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) नुसार, बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगा पश्चिम बंगालमध्ये पुढील पाच दिवसांत मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पुढील 48 तासांत नैऋत्य मान्सून ओडिशात दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, ओडिशाच्या काही भागात पाऊस (Rain) सुरू झाला आहे आणि त्याचा परिणाम लवकरच दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, 15 जून रोजी किनारपट्टीच्या राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 24 तास विजांच्या कडकडाटासह पाऊस (Monsoon News) पडण्याची शक्यता आहे.

IMD च्या प्रादेशिक केंद्रानुसार, "झारसुगुडा, सुंदरगढ, देवगड, केओंझार, संबलपूर, मयूरभंज, अंगुल, ढेंकनाल, बौध, कंधमाल, रायगडा, गजपती, गंजम, मलकानगिरी जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी गडगडाटी वादळाची शक्यता आहे. ओडिशाच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची (Monsoon) शक्यता आहे.

या राज्यांमध्ये मान्सूनने एंट्री केली आहे

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोमवारी IMD ने सांगितले होते की नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या आणखी काही भागांवर, गुजरातचा काही भाग, कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा या भागांवर परिणाम करेल.

याशिवाय तामिळनाडूचा आणखी काही भाग, बंगालचा बहुतांश भाग आणि बिहारचा काही भागात मान्सूनची एंट्री होणार आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, आता मान्सून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ (केरळ) आणि गोवा तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पूर्णपणे सक्रिय झाला आहे.

त्याचवेळी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. याशिवाय या भागात पावसाची देखील हजेरी या कालावधीत बघायला मिळू शकते. निश्चितचं त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळणार असून बळीराजा पुन्हा एकदा शेतीकामासाठी पूढे सरसावणार आहे. 

English Summary: Monsoon Update: Strong monsoon entry in this part of the country
Published on: 15 June 2022, 07:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)