Weather

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Updated on 24 May, 2024 10:46 AM IST

Weather News : अंदमानमधून मान्सूनची वाटचाल पुढे झाल्यामुळे सध्या मान्सून श्रीलंकेत पोहचला आहे. यामुळे लवकर केरळात मान्सून दाखल होणार आहे. मात्र त्यापूर्वीच केरळच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर श्रीलंकेतून पुढील २ दिवसांत मान्सून पुढे सरकले अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सूनमुळे बदलत्या वातावरणाचा राज्यात देखील परिणाम दिसून येत आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील वातावरणात बदल झाल्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव येथे ४५.३°C कमाल तापमानाची नोंद झाली.
सातारा येथे २२.५°C हे सर्वात कमी किमान तापमान होते. तसंच राजस्थानमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या राजस्थान मध्ये ४८ अंश सेल्सियस तापमान आहे.

दरम्यान, विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत देखील पावसाचा इशारा दिला आहे. यासोबत संपूर्ण मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

English Summary: Monsoon Update How is the monsoon progressing See which parts of the state will receive rain
Published on: 24 May 2024, 10:46 IST