Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, मान्सूनने सोमवारी कोकणातील संपूर्ण भागात आपली हजेरी नमूद केली आहे. खरं पाहता मान्सून 10 जून रोजी तळकोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले.
तळकोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून (Monsoon News) साठी चांगले पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सून लवकरच मुंबईत दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगितले गेले. दरम्यान मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनला (Monsoon) पुढे सरकण्यासाठी अपेक्षित असे पोषक वातावरण नसल्याने राज्यातील अनेक भागात अजूनही मान्सूनच्या पावसाची (Monsoon Rain) प्रतीक्षा बघितले जात आहे.
विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पहिल्या पावसानंतर पावसाने (Rain) उघडीप दिल्याचे चित्र देखील राज्यात बघायला मिळत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनने पदार्पण केले असून राज्यातील बहुतांशी भाग मान्सूनने व्यापला आहे. मात्र सध्या मान्सूनचा प्रवास हा संथगतीने सुरू आहे.
10 मे रोजी तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत हजेरी लावल्यानंतर मान्सूनने काही काळ विश्रांती घेतली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले असून येत्या 48 तासात मान्सून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगितले गेले आहे. हवामान विभागाच्या मते येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हाती आलेल्या अद्ययावत माहिती नुसार, पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येत्या पाच दिवसात या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते येत्या पाच दिवसात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो.
हवामान तज्ञांच्या मते, अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण मध्ये 18 तारखेपर्यंत सलग पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय शेजारील राज्य गोव्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातही हा आठवडा पावसाचा राहणार आहे. दरम्यान मान्सून ची हजेरी राज्यात लागल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे अजूनही राज्यातील जनता पावसाच्या प्रतीक्षेत बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव देखील पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत.
Published on: 14 June 2022, 09:29 IST