मान्सूनची केरळमध्ये (Kerala) झालेली सुरवात ही मुख्यत्वे अरबी समुद्र (Arabian Sea) आणि बंगालचा उपसागर (Bay of Bengal) या दोन्ही देशांतील सागरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवते. नुकत्याच आलेल्या ‘असनी’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागरात नेहमीपेक्षा लवकर बंद झाला आहे.
या एकत्रित प्रभावामुळे अरबी समुद्राच्या मध्यभागावरील अॅण्टीसायक्लोन पुसला गेला आहे. ही मान्सूनची (Monsoon) लाट वाढण्यासाठी आवश्यक होते. मान्सूनपूर्व पावसाचे केरळमध्ये दणक्यात आगमन होणार आहे. स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसार यंदा केरळमध्ये नैऋत्य मॉन्सूनचे आगमन 26 मे होण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीतच पाऊस बरसणार तर आहेच पण सरासरीच्या 98 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस यंदा बरसणार आहे. यंदा नियमित वेळी किंवा त्यापेक्षा आगोदरच पावसाला सुरवात होणार आहे.
राहुरी विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास देशात प्रथम क्रमांक
सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नियमित वेळी म्हणजेच 1 जून रोजीच मान्सूनची सुरवात होणार असल्याचे स्कायमेटने सांगितले आहे.
शेतकरी संतापला: थेट तलाठी कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
मोफत रेशनबाबत सरकारची मोठी घोषणा, आता 'या' लोकांना मोफत मिळणार नाही रेशन
Published on: 13 May 2022, 06:11 IST