Weather

केरळमध्ये तब्बल आठ दिवस विलंबाने मोसमी वारे दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांमध्ये आणखी उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमारपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होणार आहे.

Updated on 11 June, 2023 11:21 AM IST

या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

येत्या 13 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 13 जूनपर्यंत मुंबई आणि कोकणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोठी बातमी! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

भारतीय हवामान विभागानुसार (IMD)पुढील 6 तासांमध्ये अत्यंत तीव्र चक्रीवादळात Biparjoy बदलण्याची शक्यता आहे. मात्र, ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार नाही, ही दिलासादायक बाब आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ पोरबंदर किनार्‍यापासून 200-300 किमी अंतरावर जाण्याचा अंदाज आहे, परंतु 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, अत्यंत तीव्र चक्रीवादळ 'बिपरजॉय' पुढील 12 तासांत तीव्र चक्री वादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.

English Summary: Monsoon to arrive on date, Meteorological Department forecast
Published on: 11 June 2023, 11:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)