Weather

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने हजेरी लावली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

Updated on 03 October, 2023 6:19 PM IST

Weather Update : देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. यामुळे राज्यात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी सुरु आहे. राज्यातून मान्सून परतण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने हजेरी लावली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. या पावसामुळे राज्यातील धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढली आहे.

परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण झाले आहे. यामुळे राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज मंगळवारी (दि.३) विदर्भातील पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. साधारणता ५ ऑक्टोबर पर्यंत मान्सून राज्यातून परतण्यास सुरुवात होते. आणि १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच परत गेलेला असतो.

English Summary: Monsoon return journey begins When will you return from the state weather update
Published on: 03 October 2023, 06:18 IST