वेळीअवेळी धुमाकूळ घातलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता पाऊस काही दिवस निरोप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नियोजन करावे.
हवामान विभागाने (Department of Meteorology) 5 ते 10 ऑक्टोबर या दिवसात मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार आहे,अशी माहिती दिली आहे. पाऊस परत येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन केले पाहिजे. परंतु आता शेतकऱ्यांनी नेमकी कोणती कामं करावीत याविषयी आपण जाणून घेऊया.
कांद्याची लागवड
साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होतात. त्यामुळं आता कांद्याचे बी टाकले तर शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. कांद्याची रोपे तयार करून तुम्ही रोपांची पुन्हा लागवड करू शकता.
सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
खरीपातील पिकांची काढणी
खरीपातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य आहे.
याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी. सोयाबीन आणि बाजरीचे पिक (Crops of soybeans and millet) काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीननं काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावे.
पीएनबी किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; असा करा अर्ज
मकेची काढणी
मक्याची काढणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करा. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिकं 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन केले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाख रुपयांचा नफा
पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन; शेतकऱ्यांनो लवकरात लवकर करा हे काम
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकदाच रक्कम जमा करा आणि दरमहा मिळवा पेन्शन
Published on: 24 September 2022, 04:27 IST