Rain Update :
२६ सप्टेंबरपासून देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत उत्तर भारताच्या बऱ्याच भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे. १७ सप्टेंबरला राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.
५ ऑक्टोंबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परत जातो.उर्वरित राज्यातून जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात. १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच परत गेलेला असतो.
भारताच्या वायव्य भागात पश्चिम राजस्थानातील श्रीगंगानगर, बिकानेर, जोधपूर, जैसलमेर, बारमेर, झालोर यासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, सौराष्ट्रातील कच्छचे रण या भागात वातावरणात बदल झाला आहे.
राज्यामध्ये काल (दि.२१) सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण वगळता महाराष्ट्रात गुरुवार २२ सप्टेंबरपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.
राज्यातील स्थिती पाहिली तरी अद्याप मान्सून परतीचा प्रवास सुरु झालेला दिसत नाही. परतीच्या प्रवासाबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. परंतु हवामानाची स्थिती पाहता देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास २६ सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे.
Published on: 22 September 2023, 10:37 IST