Weather

भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) आणि स्कायमेट (Skymet) आमनेसामने आले आहेत. २९ मे रोजी भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली होती. पण आता या माहितीवर मतभेद होत आहेत.

Updated on 31 May, 2022 3:48 PM IST

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) आणि स्कायमेट (Skymet) आमनेसामने आले आहेत. २९ मे रोजी भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली होती. पण आता या माहितीवर मतभेद होत आहेत. स्कायमेट (Skymet) या संस्थाने हवामान विभागाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. केरळात मान्सून दाखल झाला नाही, असा दावा स्कायमेटने केला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे. पण स्कायमेट केरळमध्ये मान्सून दाखल न झाल्याचा आपल्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही संस्थामध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. स्कायमेटच्या माहितीनुसार, जर केरळात मान्सूनचे आगमन झाले असेल तर तिथे कमीत कमी दोन दिवस सारखा पाऊस पडला पाहिजे.

पोरी मानलं तुला! 11वीच्या विद्यार्थिनीनं शेतात पाणी देण्यासाठी बनवली सोलर सायकल; पंपाविना करता येणार सिंचन

या दोन दिवसात ६० टक्क्याहून आणि २.२ मीमी पेक्षा अधिक पाऊस पडला तर आपण केरळात मान्सून दाखल झाल्याचा दावा करू शकतो असं स्कायमेटने म्हटलं आहे. मान्सूनच्या आगमनाच्या तीन निकषांपैकी दोन निकष पूर्ण होत नसल्याचा दावा स्कायमेटने केला आहे.

वाह रं छोट्या उस्ताद! वयवर्षे 10, अवघ्या 26 मिनिटात 1000 जोर मारण्याचा विक्रम

त्यामुळे भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट आमनेसामने आले आहेत. पण हवामान विभागाने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता हवामान विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

English Summary: Monsoon has not come to Kerala; Skymet's claim on meteorological information
Published on: 31 May 2022, 03:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)