Weather

केरळमध्ये आज (२७ मे) मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

Updated on 27 May, 2022 10:11 AM IST

केरळमध्ये आज (२७ मे) मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सून रेंगाळत आहे. अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग जवळजवळ मान्सूनने व्यापलेला आहे, त्यामुळे मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.  एकीकडे आपण मान्सूनची वाट पाहत आहोत, तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे. विशेषत: विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाळ्याचे वेध लागलेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे.

मालदीव आणि कोरोरिन भागात मान्सून सक्रिय झाला आहे. दक्षिण आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सून असाच सुरू राहिल्यास येत्या आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू झाल्याने देशाच्या काही भागात मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत.

मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस मान्सूनचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. पश्चिमेकडील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे देशाच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व सरी अपेक्षित आहेत. पुढील चार दिवस कोल्हापूर, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कोकणात मान्सून सुरू होईल, त्यानंतर तो महाराष्ट्राच्या इतर भागात पोहोचेल. दरम्यान, राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष, डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या
अशी घ्या डोळ्यांची काळजी
Pre Mansoon Rain: मान्सूनपूर्व पावसाचे राज्यात थैमान; आता 'या' जिल्ह्यात कोसळणार मान्सूनपूर्व पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट 

English Summary: Monsoon forecast: Monsoon will arrive in Kerala today, Meteorological Department forecast
Published on: 27 May 2022, 10:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)