राज्यामध्ये मान्सूनचे आगमन व्हायला एक महिन्याचा कालावधी लोटला तरी सुद्धा महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात हव्या तशा पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे अजूनही बऱ्याच भागांमध्ये पेरण्या रखडल्या असून बळीराजा चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.
काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. या सगळ्या परिस्थितीत आता येणाऱ्या जुलै महिन्या कडे शेतकऱ्यांच्या आशा लागले असून जुलैत तरी चांगला पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
परंतु हवामान विभागाच्या अंदाजाचा विचार केला तर त्यानुसार जुलै महिन्यात देखील पावसाचे प्रमाण हे समाधानकारक नसणार असं सांगण्यात येत आहे.
परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मात्र जोरदार पावसाचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
देशातील एकंदरीत हवामान स्थिती
जर आपण आता काही दिवसांचा विचार केला तर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली परंतु तरीसुद्धा जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी आहे.
अशी स्थिती जुलैमध्ये देखील राहण्याची स्थिती असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मात्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नक्की वाचा:राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरु...
देशातील पावसाची स्थिती
जर आपण कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा पावसाची समाधानकारक स्थिती नसून या दोन्ही राज्यांमध्ये पावसाची कमतरता आहे.
परंतु याउलट परिस्थिती उत्तराखंड आणि आसाममध्ये असून या राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून मधली परिस्थिती ही वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे निर्माण झाली. परंतु आता शेवटच्या काही दिवसांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील,
अशी माहिती हवामान खात्याने दिली.जर आपण केरळ आणि कर्नाटक राज्याचा विचार केला तर मोसमी पावसाचे सर्वात आधी आगमन या ठिकाणी होते. परंतु एकंदरीत 59 टक्के केरळ मध्ये तर 26 टक्के कर्नाटक मध्ये पावसाची कमतरता जाणवली आहे.
नक्की वाचा:Rain: पुढील पाच दिवसात कुठे तुरळक तर कुठे मुसळधार; जाणून घ्या पावसाचा अंदाज..
Published on: 28 June 2022, 08:44 IST