ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही महाराष्ट्रमध्ये पाऊस झाला त्यामुळे राज्यातील बरीच धरणे तुडुंब भरली. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने ऐन बहरात असलेल्या पिकांना आता पाण्याची नितांत आवश्यकता होती. या सगळ्या परिस्थितीत आता एक आनंदाची बातमी पुढे आली असून काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे उद्यापासून पुन्हा राज्यात पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नक्की वाचा:Rain Alert: राज्यात पुन्हा मुसळधार कोसळणार! अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पावसासाठी जे काही पोषक वातावरण हवे ते अरबी समुद्रात तयार झाल्याने आणि त्यासोबतच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्यापासून पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी तसेच विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या एकंदरीत मान्सूनची परिस्थिती
बंगालचा उपसागरामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे मान्सूनचे पश्चिम वायव्य दिशेने वाटचाल सुरू आहे.
यासोबतच अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे 8 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली मध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नक्की वाचा:आता कोणी कोणाचा बांध फोडला लगेच कळणार!! ड्रोनद्वारे होणार जमिनीची मोजणी..
Published on: 07 September 2022, 08:38 IST