संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक ठिकाणी राज्यात चांगला पाऊस झाला आहे. परंतु अजुनही राज्याच्या काही ठिकाणी पावसाने दडी मारलेली दिसून येत आहे.
काही ठिकाणी खुशी काही ठिकाणी गम असे एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी अजून पेरणी बाकी असून पाणीटंचाईची समस्या कायम आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्राला यलो अलर्ट तर मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येणारे पाच दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यासोबतच दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.तर उर्वरित राज्यांमध्ये विधानाच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नक्की वाचा:Rain: पुढील पाच दिवसात कुठे तुरळक तर कुठे मुसळधार; जाणून घ्या पावसाचा अंदाज..
या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा
कोकण भागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील नगर, धुळे, जळगाव नंदुरबार ते तरी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
त्यासोबतच मराठवाडा विभागाचा विचार केला तर उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, परभणी या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भामध्ये
बुलढाणा,अकोला,वाशिम,अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीया ठिकाणीदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published on: 25 June 2022, 12:21 IST