Weather

Weather Alert: सध्या देशात मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Updated on 10 August, 2022 8:59 AM IST

Weather Alert: सध्या देशात मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्या टप्प्यातील पाऊस (Rain) कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा (Heavy Rain) तडाखा बसला आहे. तसेच अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंडसह अनेक शेजारील भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमध्ये मच्छिमारांना 11 ऑगस्टपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यासोबतच आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र (Maharashtra) , गोवा आणि तेलंगणामध्ये पावसाचा अंदाज आहे.

खुशखबर! या दिवशी येणार पीएम किसान योजनेचा 12वा हफ्ता; या लोकांना बसणार धक्का...

हवामान खात्याने आज आणि उद्या छत्तीसगड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. दुसरीकडे आज मध्य प्रदेश आणि सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर छत्तीसगड आणि विदर्भातही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गोमुत्राचा वापर पिकांना ठरणार रामबाण उपाय! उत्पन्नात होणार भरघोस वाढ; जाणून घ्या...

तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि केरळमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरच्या मते, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भाग, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आग्नेय आणि दक्षिण राजस्थान, गुजरातच्या अनेक भागात हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, पेट्रोल 84.10 तर डिझेल 79.74 रुपयांना; जाणून घ्या नवे दर...
सोने चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोने 4000 तर चांदी 21800 रुपयांनी स्वस्त, पहा नवे दर...

English Summary: Meteorological department warns of heavy rains for these states
Published on: 10 August 2022, 08:59 IST