Weather

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार मान्सून बरसत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी शेतकरी अजूनही वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच राज्यात मान्सूनच्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

Updated on 21 July, 2022 12:29 PM IST

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून जोरदार मान्सून (Monsoon) बरसत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस (Rain) पडल्यामुळे पेरणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी शेतकरी अजूनही वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच राज्यात मान्सूनच्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

गुरुवारी महाराष्ट्रात पावसाच्या हालचाली कमी होण्याची शक्यता आहे. असे असूनही अनेक ठिकाणी पाऊस सुरूच राहणार आहे. एवढेच नाही तर येत्या काही दिवसांतही मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 23 आणि 24 जुलै रोजी राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ते रविवार या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत पाऊस पडेल. मात्र, कोणत्याही प्रकारचा अलर्ट (Alert) जारी करण्यात आलेला नाही.

PM Kusum Yojana : वीजबिलाचे नो टेन्शन! फक्त 10% खर्च करा आणि शेतात बसावा सोलर पंप; कमवा लाखों, जाणून घ्या कसे?

दरम्यान, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या भागात चक्रीवादळाच्या रूपात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला असून त्यामुळे पाऊस पडेल.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात 1 जूनपासून पाऊस आणि पुरामुळे 105 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे. जाणून घेऊया गुरुवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?

Electric Scooter : पेट्रोल पासून होईल मुक्तता! घ्या सर्वाधिक विक्री होणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर

पुण्याचे हवामान

पुण्यात कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथे ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 45 वर नोंदवला गेला आहे.

मुंबईचे हवामान

गुरुवारी मुंबईत कमाल तापमान 32 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 32 नोंदवला गेला आहे.

नाशिकचे हवामान

नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 25 आहे.

नागपूरचे हवामान

नागपुरात कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि काही काळ पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, वायु गुणवत्ता निर्देशांक 52 आहे, जो 'चांगल्या' श्रेणीत येतो.

औरंगाबादचे हवामान

औरंगाबादमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. येथेही ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 52 आहे.

महत्वाच्या बातम्या :
Business Idea : शेतकरी होणार मालामाल! फक्त या फळाची लागवड करा आणि बंपर कमाई मिळवा...
Flower farming: लखपती होण्याची सुवर्णसंधी! पावसाळ्यात या फुलांची लागवड केली तर व्हाल मालामाल; जाणून घ्या...
Electric Scooter : पेट्रोल पासून होईल मुक्तता! घ्या सर्वाधिक विक्री होणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर

English Summary: Meteorological Department warns heavy rain districts Maharashtra
Published on: 21 July 2022, 12:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)