Weather

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, मुंबई, दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Updated on 11 November, 2023 2:36 PM IST

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, मुंबई, दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागांत पुढील 24 तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या पावसासह ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आणि गोव्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.येत्या 24 तासांत कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

English Summary: Meteorological department predicts rain in next 24 hours in 'these' districts of the state
Published on: 11 November 2023, 02:36 IST