यावर्षी केरळमध्ये नियोजित तारखेच्या तीन दिवस आगोदर रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळच्या बहुतांशी भागांमध्ये आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे
याबाबतीत मान्सूनचा विचार केला तर त्याचे उत्तर सीमा कन्नूर व पलक्कड पर्यंत पोहोचली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसात केरळच्या उरलेला भागांमध्ये, तामिळनाडू व इतर भागात तसेच कर्नाटकाच्या काही भागात आणि उत्तर-पूर्व राज्यात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
परंतु मान्सूनचे आगमन जरी लवकर झाले आहे परंतु त्याचा विशेष फायदा होईल याची शक्यता खूपच कमी आहे. कारण मान्सून जरी पुढे सरकणार असला तरी संपूर्ण दक्षिण भारतात कुठेही चांगला पाऊस होणार नाही. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
जर मान्सूनचा प्रवास असाच कायम राहिला तर महाराष्ट्रात सात जूनच्या आसपास दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मान्सूनच्या ज्या दोन शाखा आहेत त्या म्हणजे अरबी समुद्र तसेच बंगालचा उपसागर या दोन्ही शाखांना आगेकूच करण्यासाठी पोषक व अनुकूल वातावरण आहे.
अनेकदा मान्सूनचे आगमन अत्यंत कमकुवत असते. अशीच अवस्था या वर्षी देखील आहे. कारण मान्सून पुढे सरकण्यासाठी वारे जास्त मजबूत नाहीत तसेच अरबी समुद्र व बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार होताना दिसत नाही. त्यामुळे उत्तर पूर्व भारतापर्यंत माणसं नियोजित वेळेत पोहोचली पण उत्तर व मध्य भारतातील भागांपर्यंत पोहोचतील की नाही हे सांगणे कठीण आहे.
असे खाजगी हवामान यंत्रणा स्कायमेटचे महेश पलावत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! भारतातील टॉप 10 रोटावेटर व त्यांच्या विशेषता जाणुन घ्या
नक्की वाचा:तीन महिन्यातील सर्वांधिक रुग्णांची नोंद! महाराष्ट्रात कोरोना वेगाने पसरतोय
Published on: 30 May 2022, 10:08 IST