Weather

Mansoon Update: दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उष्णतेशी झुंज देणारी उत्तर भारतातील राज्ये व आपल्या महाराष्ट्रातील जनता सध्या मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated on 11 June, 2022 9:37 PM IST

Mansoon Update: दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उष्णतेशी झुंज देणारी उत्तर भारतातील राज्ये व आपल्या महाराष्ट्रातील जनता सध्या मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. 

दरम्यान, हवामान खात्याने (IMD) मान्सूनबाबत (Mansoon Rain) चांगली बातमी दिली आहे. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, पूर्व गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

भारतीय हवामान विभागानुसार (Indian Meteorological Department), काल मान्सून कोकणात दाखल झाला आहे. आज मान्सूनने चांगली प्रगती केली असून मान्सून आज मुंबईत दाखल झाला आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर बिहार आणि झारखंडमध्ये पुढील दोन दिवस पाऊस पडू शकतो.

मान्सून राजधानी मुंबईत दाखल

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) मान्सूनची एन्ट्री झाल्याची माहिती हवामान खात्याने ट्विट करून दिली आहे. मुंबईच्या काही भागात आज पाऊस (Rain) देखील झाला आहे. मुंबईत मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर आता दिल्लीतील लोकांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आयएमडीनुसार मान्सूनची प्रगती चांगली होत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 14 जूनपर्यंत पाऊस राहणार आहे. यादरम्यान मुंबईतील अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहणार आहे. आज मुंबईत किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 34 अंशांवर पोहोचले होते.

या भागात राहणार उष्णतेची लाट

बर्‍याच राज्यांमध्ये पाऊस अपेक्षित असताना, उत्तर-पश्चिम, मध्य आणि लगतच्या पूर्व भारताच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

English Summary: Mansoon update mansoon reached in mumbai read mansoon update
Published on: 11 June 2022, 09:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)