Weather

मान्सूनची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmers) एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मानसूनचे नुकतेच केरळमध्ये आगमन (Mansoon In Kerala) झाले आहे. याशिवाय आजपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Updated on 30 May, 2022 1:38 PM IST

मान्सूनची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmers) एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मानसूनचे नुकतेच केरळमध्ये आगमन (Mansoon In Kerala) झाले आहे. याशिवाय आजपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाचा मते (Indian Meteorological Department), आजपासून महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात (Marathwada) पावसाची (Pre Mansoon Rain) दाट शक्यता आहे. यामुळे निश्चितच मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे.

काल मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. खरं पाहता दरवर्षी मान्सून 1 जूनला केरळ गाठत असतो. मात्र यावर्षी मान्सून हा तीन ते चार दिवस लवकर दाखल झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील या वर्षी मान्सून लवकर येणार असल्याचे सांगितले जात असून चार जूनच्या आसपास मान्सून हा तळकोकण गाठणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाकडून वर्तवले जात आहे.

दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात 30 मे अर्थात आजपासून ते 01 जूनदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या काळात मराठवाड्यात वादळी वारे व विजांचा कडकडाट राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 31 मे व एक जूनला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून वर्तवले जात आहे.

या दरम्यान राज्यातील शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामातील पेरणीसाठी पूर्व नियोजन करताना बघायला मिळत आहे. अनेक शेतकरी बांधव पूर्वमशागत उरकून बी बियाणे तसेच रासायनिक खतांचा साठा करताना बघायला मिळत आहेत. तर काही शेतकरी बांधव पूर्व मशागतीची अंतिम टप्प्यातील कामे जोमात करत असल्याचे चित्र या वेळी राज्यात बघायला मिळत आहे.

English Summary: Mansoon Rain: Rains start in Maharashtra from today; It will rain heavily in this place
Published on: 30 May 2022, 01:38 IST