देशात सध्या सर्वत्र मान्सून (Mansoon) विषयक चर्चा रंगल्या आहेत. मान्सून दाखल होण्याबाबत भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था स्कायमेटने (Skymet Weather Update) वर्तवलेले अंदाज आज मान्सूनने (Mansoon Rain) खोटे ठरवले आहेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून (Mansoon Arrival In Keral) 27 मे रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता याशिवाय हवामान अंदाज (Weather Update) वर्तवणारी संस्था स्कायमेंटने मान्सून केरळमध्ये 26 मे रोजी दाखल होईल अशी भविष्यवाणी केली होती.
मात्र आज मान्सून बाबत वर्तवलेला भारतीय हवामान विभागाचा तसेच स्कायमेंटचा अंदाज साफ खोटा ठरला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मान्सूनचा अंदाज वर्तवताना मान्सूनचे आगमन चार पाच दिवस मागेपुढे होऊ शकते.
दरम्यान मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज चुकला असला तरी देखील भारतीय हवामान खात्याने दावा केला आहे की, हवामान विभाग लवकरच मान्सूनच्या आगमनाचा अचूक अंदाज घेऊन हजर होणार आहे. गुरुवारी केरळ मधील सर्व केंद्रांपैकी केवळ 33% केंद्रावर पावसाची हजेरी बघायला मिळाली आहे.
मित्रांनो खरं पाहता 10 मे नंतर केरळ मधील सगळ्या हवामान केंद्रापैकी 60 टक्के केंद्रांवर सुमारे 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही तोपर्यंत मान्सूनचे आगमन झालेले नाही असे समजले जाते. यामुळे तूर्तास तरी केरळमध्ये मान्सून चे आगमन झालेले नाही हे स्पष्ट झाले आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत सर्व निकषांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत मान्सूनचे आगमन गृहीत धरले जातं नाही. यामुळे देशात अजून मान्सून येण्यास उशीर असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच मान्सूनने यावर्षी भारतीय हवामान विभागाचा अंदाज साफ खोटा ठरवला असून आपल्या विश्वासाहर्ता साठी ओळखली जाणारी स्कायमेट या संस्थेचा अंदाज देखील यावेळी निकामी ठरला आहे.
असे असले तरी, 1 जून पर्यंत देशात मान्सूनचे आगमन ठरलेलंच असल्याचे तज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. यामुळे या वर्षी मान्सून लवकर दस्तक देणार असल्याचा अंदाज चुकला असून कदाचित यावर्षी देखील मान्सून आपल्या नेहमीच्या वेळी देशात दाखल होऊ शकतो असे चित्र बघायला मिळत आहे.
Published on: 27 May 2022, 05:23 IST