Weather

मान्सूनची (Mansoon) वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य जनतेसाठी एक धक्कादायक आणि चिंतेची बाब समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) 27 मे रोजी मान्सून हा केरळमध्ये (Kerala Mansoon) दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणा-या खासगी संस्था स्कायमेंटने (Skymet Weather Update) देखील मान्सून हा 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असे भाकित वर्तवले होते.

Updated on 28 May, 2022 3:32 PM IST

मात्र, भारतीय हवामान विभाग तसेच स्कायमेटचा अंदाज चुकला असून आता मान्सून (Mansson Rain) कासव गतीने पुढे सरकत आहे. मान्सूनचा वेग कमालीचा मंदावला असल्याने मान्सून केरळमध्ये पोहोचण्यास आता 31 मे उजाडणार हे स्पष्ट झाले आहे.

मान्सून जर 31 तारखेला केरळमध्ये पोहचला तर केरळहुन तळकोकण (Konkan Mansoon Rain) गाठायला मान्सूनला 16जुनचा दिवस उजाडू शकतो असा अंदाज आता भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही धक्कादायक बातमी आहे.

यादरम्यान, राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्यात सध्या स्थितीला अपेक्षित असा पूर्व मोसमी पाऊस बघायला मिळत नसून पाच जूनच्या आसपास पूर्व मोसमी पावसाची राज्यात हजेरी बघायला मिळणार आहे. मान्सूनचा प्रवास हा सध्या कासवगतीने जरी सुरू असला तरीदेखील 13 ते 23 जूनच्या दरम्यान राज्यात मध्यम स्वरूपाचा मोसमी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे सध्या राज्यातील शेतकरी बांधवांचे तसेच सामान्य जनतेचे मान्सूनच्या प्रवासाकडे बारीक लक्ष आहे. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण देखील यावेळी बघायला मिळत आहे यामुळे काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसाचा इशारा विभागाने जारी केला आहे.

केरळ मध्ये सध्या ढगाळ वातावरण असून पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग देखील आता वाढला आहे. यामुळे सध्याची परिस्थिती केरळमध्ये मान्सून आगमनास अनुकूल असल्याचे समजत आहे. यामुळे आगामी दोन-तीन दिवसात केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी पाऊस हजेरी लावणार हे बाकी फिक्स आहे.

दरम्यान आज आणि उद्या म्हणजेचं 29 मे रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

याशिवाय गोव्यात देखील आज आणि उद्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 30 मे आणि 31 मे ला दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे यावेळी हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.

English Summary: Mansoon: Monsoon turtle speed, now monsoon rains will come on June 16 in the state; The farmers missed the beat
Published on: 28 May 2022, 03:32 IST