Weather

गेल्या आठवड्यापासून उत्तर भारतातील सर्व राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून (Heat Wave) दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना हवामान खात्याने खुशखबर दिली आहे. आयएमडीने (IMD) सांगितले की, मान्सूनने केरळमध्ये 29 मे रोजी म्हणजे सामान्यपेक्षा तीन दिवस आधी प्रवेश केला आहे.

Updated on 30 May, 2022 8:13 AM IST

गेल्या आठवड्यापासून उत्तर भारतातील सर्व राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून (Heat Wave) दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना हवामान खात्याने खुशखबर दिली आहे. आयएमडीने (IMD) सांगितले की, मान्सूनने केरळमध्ये 29 मे रोजी म्हणजे सामान्यपेक्षा तीन दिवस आधी प्रवेश केला आहे.

केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा तीव्र झाली आहे. त्याचबरोबर आता कर्नाटक आणि महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व हालचाली वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितले की, येत्या काही दिवसांत केरळच्या (Kerala Mansoon) उर्वरित भागासह, मान्सूनची प्रणाली कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढे सरकेल.

केरळमध्ये पुढील 5 दिवस पाऊस आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी दिल्लीबाबत बोलायचे झाले तर आज 30 मे रोजी राजधानीतही पाऊस पडू शकतो. दिल्लीत आज किमान तापमान 28 अंश तर कमाल तापमान 41 अंश आहे.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

केरळ आणि माहेमध्ये 1 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी आज लक्षद्वीपमध्ये पाऊस पडू शकतो. याशिवाय आज हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड आणि कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसात कोकणमार्गे मुंबईत मान्सून पूर्व पावसाची दस्तक बघायला मिळू शकते. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. एकंदरीत मान्सूनची चाहूल आता संपूर्ण देशात बघायला मिळत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, महाराष्ट्रात दहा जून पर्यंत मान्सून आगमन होणार आहे. महाराष्ट्रातील तळकोकण गाठल्यानंतर मान्सून हा अवघ्या चार दिवसात मुंबईत प्रवेश करत असतो. यामुळे मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेसाठी निश्चितच ही दिलासा देणारी बाब आहे.

English Summary: Mansoon Breaking Monsoon arrives in Kerala, heavy rains begin; It will rain in this place too; Read on
Published on: 30 May 2022, 08:13 IST