Weather News : राज्यातील वातावरणात मागील काही दिवसांपासून बदल होत आहे. तसंच तापमानात देखील चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याने राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भात पावसाचा अंदाज
राज्यातील बदलत्या हवामानाचा पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आलेत. तसंच मुंबई, पुण्यासह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये तापमानात घट नोंदवली आहे. यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. हवामान सतत थंड राहते. त्याचबरोबर थंडीबरोबरच धुक्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये थंडीच्या लाटेसह धुके कायम आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सांगितले की, पुढील 4-5 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवसांत उत्तर भारतात थंड दिवसाची स्थिती राहील. मात्र, त्यानंतर थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल.
Published on: 23 January 2024, 10:01 IST