Weather

Weather News : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मुसळधार पावसामुळे वातावरण पुन्हा थंड झाले आहे. तसं पाहिलं तर दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.

Updated on 02 February, 2024 10:02 AM IST

Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. आता राज्यातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर निफाडमध्ये ९.१ निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील तापमान १० अंशांवर राहिल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसंच आगामी काळाची उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.

उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मुसळधार पावसामुळे वातावरण पुन्हा थंड झाले आहे. तसं पाहिलं तर दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.

आयएमडीने म्हटले की, पंजाबच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान ९-१२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसामुळे किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज जम्मू आणि काश्मीरमध्ये हलक्या ते मध्यम हिमवृष्टीची शक्यता आहे. लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत पावसासह दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी, आज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली येथे हलका ते मध्यम पावसाचा पावसाचा अंदाज दिला आहे.

English Summary: Maharashtra Weather Update Forecast of rise in temperature in the state
Published on: 02 February 2024, 10:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)