Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच होते. मात्र आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात मान्सूनचा (Monsoon) जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील (Kharif season) पिके जोमात आली आहेत. तर काही भागात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिके सुकायला लागली आहेत.
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops) झाले आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके उध्वस्त झाली आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील मातीही वाहून गेल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली तरी गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यात पुन्हा एकदा मौसमी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतकामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे.
संकटाची मालिका संपेना! पावसातून सावरताच पिकांवर कीड आणि रोगांचे सावट; शेतकरी चिंतेत...
राज्यातील अनके जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान केंद्र मुंबईने (Mumbai Weather Station) अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याशिवाय इतर ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
या जिल्ह्यांव्यतिरिक्त सोलापूर, हिंगोली आणि नांदेडमध्येही रविवारी हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की महाराष्ट्रात सक्रिय मान्सूननंतर, अधूनमधून पाऊस सतत सुरू आहे.
पावसामुळे आतापर्यंत 125 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते मध्यम' श्रेणीत नोंदवला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य! “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच"
PM Kisan: सावधान! उरले फक्त 2 दिवस; करा हे काम अन्यथा मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे
Published on: 29 August 2022, 09:13 IST